मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९

शिवजयंती निमित्त....


  • माफ करा महाराज

पराकोटीचे दुःख पाहून अंतःकरण कळवळले
म्हणून तर प्राणांची बाजी लावून लढायचे तुम्ही ठरवले
परकियांआधी स्वकियांशी लढला 
बाईच्या पदराला झोंबणार्‍या रांझाच्या पाटलाचा हात कलम केला
तुमचे हे नितळ तत्व समजलेच नाही
माफ करा महाराज
आम्ही सुधरलोच नाही ॥ धृ ॥

बाळगोपाळांची फौज बनवूनa
यवनांविरुद्ध झुंजण्याआधी संपविली पेंढारशाही
आपला म्हणून कुणाची गय केली नाही ॥ १॥
मावळे जमवताना
जात कुठे हो पाहिली..?
म्हणून तर
जिवाला जीव देणारी
जीवा महालेसारखी माणसं तुम्हाला भेटली
तुमची ही शिवनीती आम्हा समजलीच नाही ॥ ३ ॥
" ब्राह्मण म्हणून मुलाहिजा कोण पाहतो ? "
म्हणत अंगावर आलेला भास्कर्‍या कापून,
मनुस्मृती फाडली तुम्ही ॥ ४ ॥
राबत्या हातांना आणि माय मावल्यांना देऊन दिलासा हरामखोर
गद्दारांची केली त्राही त्राही ॥५॥
विचार तुमचे सोडले म्हणून
महाराज ,
माजली हुकूमशाही
भक्त बनून
देव्हारा मिरवतो आम्ही,
माफ करा महाराज
आम्ही सुधरलोच नाही..!

बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण शाक्त सम्राट छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!


शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१९

ये अशी 

----------
ये अशी जवळ सरक
भिऊ नकोस 
या अंधाराला
आता उजाडेलच हिंगंतिंगं
रात्र सरेपर्यंत
बसू बोलत
हल्लेखोर येणार नाहीत आता परत
स्वतःला सावर
पिलांना घे पंखाखाली
घाबरलेत ते
कान फूक त्यांचे
तोपर्यंत मीही येतो खुरडत
मुठभर उजेड घेऊन
आपल्या जळत्या झोपड्यांतून
थोडासा अंगार घेऊन

पत्नी साठी जन्मदिवसाच्या शुभेच्छा



तुझ्या रुपाचं गं सखे
कसं चांदणं पडलं
माझ्या उन्हाळ मनात
हिरवं सपन दिसलं
तुझ्या डोळ्यांत दिसली
मला बुद्धाची करुणा
माझ्या भैरवीला बये
तुझ्या मारव्याचे बोल
तुझ्या संगतीनं सये
सुख संसारी पाहिलं
व्हतो कट्टाळलो जगा
मला जगणं कळालं
सखे सुरेख, अशीच बहरत रहा...वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ...!

"तुम्ही कपडे काढले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू"

"तुम्ही कपडे काढले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू"  _ मणिपूर मध्ये अनेक महिलांची नग्न धिंड व बलात्काराचे अस्वस्थ क...