शुक्रवार, २१ जुलै, २०२३

"तुम्ही कपडे काढले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू"

"तुम्ही कपडे काढले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू" 

_मणिपूर मध्ये अनेक महिलांची नग्न धिंड व बलात्काराचे अस्वस्थ करणारे भयाण वास्तव_

इकडे पंतप्रधान मोदी 38 राजकीय पक्षांना दिल्लीत गोळा करुन 2024 निवडणुकीत स्वतःची खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करत असताना तिकडे मणिपूरमध्ये कुकी समाजातील अनेक महिलांची नग्न करुन धिंड काढली जात आहे. अनेकजण रस्त्यातच त्या महिलांचा विनयभंग करत आहेत, व नंतर शेतात ओढत नेऊन त्यांच्यावर सामुदायिक बलात्कार केले जात आहेत. त्यातील एका एकवीस वर्षीय तरुणाच्या लहान भावाने आपल्या बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु जमावातील सदस्यांनी त्याच्या समोर त्याचा बहिणीवर बलात्कार केला व त्याची निर्घृण हत्या केली. 

वरकरणी हा कुकी आणि मैतेई या दोन समुदायांमधील वाद असल्याचे दिसत असला तरी भाजप सत्तेत आल्यापासून उग्रवादी संघटनेनी पसरवलेला जातीय द्वेष हे या मागचे प्रमुख कारण आहे. कित्येक दशके एकत्र राहणारे हे समुदाय आता अचानक एकमेकांच्या जीवावर का उठले?

2017 साली झालेल्या निवडणुकीत भाजपचे राम माधव आणि हेमंत बिसवा शर्मा यांनी निवडणूक जिंकण्यासाठी युनायटेड कुकी लिबरेशन फ्रंट या उग्रवादी संघटनेची मदत घेतली होती असे आता उघड झाले आहे. त्यांना करोडो रुपयांची आर्थिक रसद पुरवून भाजपने निवडणुकित दहशत पसरवून मतदान हातात घेतले व निवडणुका एकतर्फी जिंकल्या. या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या सहा उमेदवारांची मतदान पूर्वीच हत्या झाली होती. त्यानंतर 2019 ची लोकसभा निवडणूक व 2022 ची मणिपूर विधानसभा निवडणुकीत भाजपने याच उग्रवादी संघटनेशी हातमिळवणी करुन विरोधी पक्षातील सर्व सक्षम उमेदवार भाजपमध्ये खेचून घेतले व सत्ता प्रस्थापित केली.

आता युनायटेड कुकी लिबरेशन फ्रंट या उग्रवादी संघटनेत फूट पडली व या संघटनेचा प्रमुख एस. एस. हायकोप याने गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून मैतेई समुदायावर निर्बंध लावण्याची मागणी केली. या पत्रात त्याने त्याच्या उग्रवादी संघटनेने निवडणुकीत भाजपला केलेल्या मदतीचा उल्लेख केला व राम माधव व हेमंत बिस्वा शर्मा यांच्यासोबत मैतेई समुदायावर निर्बंध लावण्याचा करार झाला होता असेही सांगितले. हे पत्र आणि भाजपने उग्रवादी संघटनेशी केलेला करार उघड होताच मैतेई समुदायाचे लोक संतप्त होऊन रस्त्यावर उतरले व भाजप सरकार विरुध्द निदर्शने करु लागले. संपूर्ण मणीपुर मध्ये सुरू झालेली ही उग्र निदर्शने थांबवण्यासाठी तेथील भाजप सरकारचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी पुन्हा युनायटेड कुकी लिबरेशन फ्रंट या उग्रवादी संघटनेची मदत घेतली. या संघटनेतील कुकी उग्रवाद्यांनी मैतेई समाजातील लोकांना अक्षरशः घरातून ओढून जिवंत जाळायला सुरू केले. भयग्रस्त मैतेई समाजातील लोक घरदार सोडून पळून जाऊ लागले. आतापर्यंत या समाजातील 300 हुन अधिक लोकांची हत्या झाली आहे, 1700 घरे उध्वस्त केली असून 35000 लोक घरदार सोडून पळून गेले आहेत. मैतेई समाजातील अनेक महिलांवर सामुदायिक बलात्कार केले जात आहेत. ही उग्रवादी संघटना इतकी हिंस्त्र झाली आहे की आता भाजप सरकार सुद्धा या संघटनेतील उग्रवाद्यांवर नियंत्रण आणण्यात असफल झाले आहे. राज्यातील परिस्थिती भाजप सरकारच्या हाताबाहेर गेली आहे. या उग्रवादी संघटनेने भाजपला अनेक निवडणुका हायजॅक करण्यासाठी मदत केली असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर बाबत मौन बाळगून आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी दौरा केल्यानंतर काही दिवस हिंसाचार थांबला पण आता पुन्हा हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. 8 मे पासून मणिपूर राज्यात सुरू झालेले हिंसाचाराचे सत्र आज सुद्धा सुरूच आहे. आता तर मैतेई समाजातील महिलांना नग्न करुन रस्त्यावर धिंड काढली जात आहे व त्यांच्यावर सामुदायिक बलात्कार केले जात आहेत. दंगलीच्या पार्श्वभूमीवर काही विकृत लोक आपल्या वासनेची आग विझवून घेत आहेत. 

भारताच्या 70 वर्षांच्या इतिहासात देशातील एका राज्यात दोन महिने अशा प्रकारचा हिंसाचार आणि अत्याचार सुरु असणे ही लाजिरवाणी बाब आहे. 1972 साली स्थापन झालेल्या या राज्यात अनेक उग्रवादी संघटना कार्यरत असल्यातरी बहुसंख्य लोक शांततेने नांदत होती. या राज्याला दृष्ट लागली. गेली दोन महिने मणिपूर मध्ये हिंसाचार, जाळपोळ, बलात्कार व हत्यांचे सत्र सुरूच आहे. लाखों लोक राज्य सोडून पळून गेले आहेत. मणिपूर धगधगत आहे... आणि सत्तेत येण्यासाठी उग्रवादी संघटनेची मदत घेऊन लाचार झालेले भाजप सरकार हतबल होऊन बघत बसले आहे.

- प्रद्युम्न झा

सोमवार, १७ जुलै, २०२३

(MAHA DES) महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात 260 जागांसाठी भरती

 (MAHA DES) महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात 260 जागांसाठी भरती



Total: 260 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सहायक संशोधन अधिकारी, गट-ब39
2सांख्यिकी सहायक,गट-क94
3अन्वेषक,गट-क127
Total260

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: सांख्यिकी/ बायोमेट्री/गणित/अर्थशास्त्र/ इकॉनॉमेट्रिक्स/गणिती अर्थशास्त्र/वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + ISI/ICAR मधून संख्या शास्त्रातील पदव्युत्तर पदविका.
  2. पद क्र.2: गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदव्युत्तर पदवी किंवा 45% गुणांसह गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदवी.
  3.  पद क्र.3: 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-  [अराखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2023 (11:59 PM)

परीक्षा (Online): सप्टेंबर 2023

शुक्रवार, १४ जुलै, २०२३

(Nagar Parishad) महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत 1782 जागांसाठी भरती

 (Nagar Parishad) महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत 1782 जागांसाठी भरती


जाहिरात क्र.: नपप्रसं/कक्ष-3ब/संवर्ग पदभरती/प्र
.क्र/01/2023/3838

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा 2023

Total: 1782 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.परीक्षापदाचे नावपद  संख्या
1महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य)स्थापत्य अभियंता, गट-क291
2महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत)विद्युत अभियंता, गट-क48
3महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक)संगणक अभियंता,गट-क45
4महाराष्ट्र नगर परिषद पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवापाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट-क65
5महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभागलेखापरीक्षक/लेखापाल,गट-क247
6महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारणकर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट-क579
7महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवाअग्निशमन अधिकारी, गट-क372
8महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवास्वच्छता निरीक्षक, गट-क35
Total1782

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  2. पद क्र.2: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  3. पद क्र.3: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  4. पद क्र.4: (i) मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  5. पद क्र.5: (i) B.Com   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  6. पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  7. पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून  उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम  उत्तीर्ण (iii) MS-CIT किंवा समतुल्य
  8. पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा

वयाची अट: 20 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-     [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹900/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2023 (11:59 PM)

अधिक माहिती साठी संपर्क करा : Join Whatsaap Group

बुधवार, १२ जुलै, २०२३

(Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 400 जागांसाठी भरती

 


(Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 400 जागांसाठी भरती   
   
                  

   जाहिरात क्र.: AXl/ST/RP/Officers in Scale II & Ill /Notification/2023-24

Total: 400 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ऑफिसर स्केल III100
2ऑफिसर स्केल II300
Total400

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/PWD: 55% गुण] किंवा CA/CMA/CFA  (ii) 05 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/PWD: 55% गुण] किंवा CA/CMA/CFA  (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 31 मार्च 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 25 ते 38 वर्षे
  2. पद क्र.2: 25 ते 35 वर्षे

Fee: General/OBC/EWS: ₹1180/-     [SC/ST/PWD: ₹118/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2023

(Talathi Bharti) महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती 2023

(Talathi Bharti) महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती 2023

 जाहिरात क्र.: तलाठी भरती/प्र.क्र./45/2023

Total: 4644 जागा

पदाचे नाव: तलाठी (गट-क)

अ.क्र.जिल्हा पद संख्या अ.क्र. जिल्हा पद संख्या
1अहमदनगर25019नागपूर177
2अकोला4120नांदेड119
3अमरावती5621नंदुरबार54
4औरंगाबाद16122नाशिक268
5बीड18723उस्मानाबाद110
6भंडारा6724परभणी105
7बुलढाणा4925पुणे383
8चंद्रपूर16726रायगड241
9धुळे20527रत्नागिरी185
10गडचिरोली15828सांगली98
11गोंदिया6029सातारा153
12हिंगोली7630सिंधुदुर्ग143
13जालना11831सोलापूर197
14जळगाव20832ठाणे65
15कोल्हापूर5633वर्धा78
16लातूर6334वाशिम19
17मुंबई उपनगर4335यवतमाळ123
18मुंबई शहर1936पालघर142

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. 

वयाची अट: 17 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय:₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2023 (11:55 PM)

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

मंगळवार, ११ जुलै, २०२३

(IBPS Clerk) IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती


 जाहिरात क्र.: CRP Clerks-XIII

Total: 4045+ जागा

पदाचे नाव: लिपिक

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी.  (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2023

परीक्षा:   

  1. पूर्व परीक्षा: ऑगस्ट/सप्टेंबर 2023
  2. मुख्य परीक्षा: ऑक्टोबर 2022

गुरुवार, ६ जुलै, २०२३

(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये अप्रेंटिस पदांच्या 466 जागांसाठी भरती

 




जाहिरात क्र.: MDLATS/02/2023

Total: 466 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ. क्र.ट्रेडपद संख्या 
ग्रुप A 
1ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)20
2इलेक्ट्रिशियन31
3फिटर66
4पाईप फिटर26
5स्ट्रक्चरल फिटर45
ग्रुप B 
6फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर)50
7इलेक्ट्रिशियन25
8ICTSM20
9इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक30
10RAC10
11पाईप फिटर20
12वेल्डर25
13COPA15
14कारपेंटर30
ग्रुप C 
15रिगर23
16वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक)30
Total466

शैक्षणिक पात्रता:  

  1. ग्रुप A: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
  2. ग्रुप B: 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
  3. ग्रुप C: 50% गुणांसह 08वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]

वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. ग्रुप A: 15 ते 19 वर्षे
  2. ग्रुप B: 16 ते 21 वर्षे
  3. ग्रुप C: 14 ते 18 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: General/OBC/SEBC/EWS/AFC: ₹100/-   [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2023

परीक्षा (Online): ऑगस्ट 2023 

Chat on Whatsaap

"तुम्ही कपडे काढले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू"

"तुम्ही कपडे काढले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू"  _ मणिपूर मध्ये अनेक महिलांची नग्न धिंड व बलात्काराचे अस्वस्थ क...