बुधवार, १२ जुलै, २०२३

(Talathi Bharti) महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती 2023

(Talathi Bharti) महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती 2023

 जाहिरात क्र.: तलाठी भरती/प्र.क्र./45/2023

Total: 4644 जागा

पदाचे नाव: तलाठी (गट-क)

अ.क्र.जिल्हा पद संख्या अ.क्र. जिल्हा पद संख्या
1अहमदनगर25019नागपूर177
2अकोला4120नांदेड119
3अमरावती5621नंदुरबार54
4औरंगाबाद16122नाशिक268
5बीड18723उस्मानाबाद110
6भंडारा6724परभणी105
7बुलढाणा4925पुणे383
8चंद्रपूर16726रायगड241
9धुळे20527रत्नागिरी185
10गडचिरोली15828सांगली98
11गोंदिया6029सातारा153
12हिंगोली7630सिंधुदुर्ग143
13जालना11831सोलापूर197
14जळगाव20832ठाणे65
15कोल्हापूर5633वर्धा78
16लातूर6334वाशिम19
17मुंबई उपनगर4335यवतमाळ123
18मुंबई शहर1936पालघर142

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. 

वयाची अट: 17 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय:₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2023 (11:55 PM)

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

मंगळवार, ११ जुलै, २०२३

(IBPS Clerk) IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती


 जाहिरात क्र.: CRP Clerks-XIII

Total: 4045+ जागा

पदाचे नाव: लिपिक

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी.  (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2023

परीक्षा:   

  1. पूर्व परीक्षा: ऑगस्ट/सप्टेंबर 2023
  2. मुख्य परीक्षा: ऑक्टोबर 2022

गुरुवार, ६ जुलै, २०२३

(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये अप्रेंटिस पदांच्या 466 जागांसाठी भरती

 




जाहिरात क्र.: MDLATS/02/2023

Total: 466 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ. क्र.ट्रेडपद संख्या 
ग्रुप A 
1ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)20
2इलेक्ट्रिशियन31
3फिटर66
4पाईप फिटर26
5स्ट्रक्चरल फिटर45
ग्रुप B 
6फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर)50
7इलेक्ट्रिशियन25
8ICTSM20
9इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक30
10RAC10
11पाईप फिटर20
12वेल्डर25
13COPA15
14कारपेंटर30
ग्रुप C 
15रिगर23
16वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक)30
Total466

शैक्षणिक पात्रता:  

  1. ग्रुप A: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
  2. ग्रुप B: 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
  3. ग्रुप C: 50% गुणांसह 08वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]

वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. ग्रुप A: 15 ते 19 वर्षे
  2. ग्रुप B: 16 ते 21 वर्षे
  3. ग्रुप C: 14 ते 18 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: General/OBC/SEBC/EWS/AFC: ₹100/-   [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2023

परीक्षा (Online): ऑगस्ट 2023 

Chat on Whatsaap

(SWR) दक्षिण पश्चिम रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 904 जागांसाठी भरती


 जाहिरात क्र.: SWR/RRC/Act Appr/01/2023

Total: 904 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण     (ii) ITI (फिटर, वेल्डर, फिटर,इलेक्ट्रिशियन, रेफ्रिजरेटर & AC मेकॅनिक, PASAA, मशिनिस्ट, टर्नर, कारपेंटर, स्टेनोग्राफर, पेंटर)

वयाची अट: 02 ऑगस्ट 2023 रोजी 15 ते 24 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: हुबली, बेंगलुरु & मैसूर.

Fee: General/OBC: ₹100/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 ऑगस्ट 2023 

Chat on WhatsApp

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९

शिवजयंती निमित्त....


  • माफ करा महाराज

पराकोटीचे दुःख पाहून अंतःकरण कळवळले
म्हणून तर प्राणांची बाजी लावून लढायचे तुम्ही ठरवले
परकियांआधी स्वकियांशी लढला 
बाईच्या पदराला झोंबणार्‍या रांझाच्या पाटलाचा हात कलम केला
तुमचे हे नितळ तत्व समजलेच नाही
माफ करा महाराज
आम्ही सुधरलोच नाही ॥ धृ ॥

बाळगोपाळांची फौज बनवूनa
यवनांविरुद्ध झुंजण्याआधी संपविली पेंढारशाही
आपला म्हणून कुणाची गय केली नाही ॥ १॥
मावळे जमवताना
जात कुठे हो पाहिली..?
म्हणून तर
जिवाला जीव देणारी
जीवा महालेसारखी माणसं तुम्हाला भेटली
तुमची ही शिवनीती आम्हा समजलीच नाही ॥ ३ ॥
" ब्राह्मण म्हणून मुलाहिजा कोण पाहतो ? "
म्हणत अंगावर आलेला भास्कर्‍या कापून,
मनुस्मृती फाडली तुम्ही ॥ ४ ॥
राबत्या हातांना आणि माय मावल्यांना देऊन दिलासा हरामखोर
गद्दारांची केली त्राही त्राही ॥५॥
विचार तुमचे सोडले म्हणून
महाराज ,
माजली हुकूमशाही
भक्त बनून
देव्हारा मिरवतो आम्ही,
माफ करा महाराज
आम्ही सुधरलोच नाही..!

बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण शाक्त सम्राट छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!


शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१९

ये अशी 

----------
ये अशी जवळ सरक
भिऊ नकोस 
या अंधाराला
आता उजाडेलच हिंगंतिंगं
रात्र सरेपर्यंत
बसू बोलत
हल्लेखोर येणार नाहीत आता परत
स्वतःला सावर
पिलांना घे पंखाखाली
घाबरलेत ते
कान फूक त्यांचे
तोपर्यंत मीही येतो खुरडत
मुठभर उजेड घेऊन
आपल्या जळत्या झोपड्यांतून
थोडासा अंगार घेऊन

पत्नी साठी जन्मदिवसाच्या शुभेच्छा



तुझ्या रुपाचं गं सखे
कसं चांदणं पडलं
माझ्या उन्हाळ मनात
हिरवं सपन दिसलं
तुझ्या डोळ्यांत दिसली
मला बुद्धाची करुणा
माझ्या भैरवीला बये
तुझ्या मारव्याचे बोल
तुझ्या संगतीनं सये
सुख संसारी पाहिलं
व्हतो कट्टाळलो जगा
मला जगणं कळालं
सखे सुरेख, अशीच बहरत रहा...वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ...!

"तुम्ही कपडे काढले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू"

"तुम्ही कपडे काढले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू"  _ मणिपूर मध्ये अनेक महिलांची नग्न धिंड व बलात्काराचे अस्वस्थ क...