एकदा केंव्हा तरी शांतपणे बसावंआणि वयानुसार आपण
काय काय गोष्टी सोडल्या याचा आढावा घ्यावा.
मग लक्षात येतं की,
आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात् खाल्लेली नाही.
जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही.
चटक्यांच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण
परिस्थितीने दिलेले चटके सोसतानाच पुरेवाट झालेली आहे.
कॅलिडोस्कोप पाह्यलेला नाही.
सर्कस मधला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही.
तसच कापसाची म्हातारी पकडण्याचाचार्म ही राह्यलेला नाही.
कापसाच्या म्हातारीने उडता उडताआपला “बाळपणीचा काळ सुखाचा”
स्वतः बरोबर कधी नेला ते आपल्याला कळलंच नाही.
आता त्या ट्रिप्स नाहीत.
दोन दोन मुलांच्या जोड्या करुन चालणं नाही.
विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत.
प्रवासात बोगदा आला तर एक अनामिकहुरहुर नाही….
त्या उडणा-या म्हातारीने हे सगळे आनंद नेले.
त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं.
म्हणूनच ती अजुनही उडू शकते.
आपण अजून जमिनीवरच आहोत॥
-मंगेश पाडगांवकर
बुधवार, ५ डिसेंबर, २०१२
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
"तुम्ही कपडे काढले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू"
"तुम्ही कपडे काढले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू" _ मणिपूर मध्ये अनेक महिलांची नग्न धिंड व बलात्काराचे अस्वस्थ क...
-
(Nagar Parishad) महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत 1782 जागांसाठी भरती जाहिरात क्र.: नपप्रसं/कक्ष-3ब/संवर्ग पदभरती/प्र .क्र/01/2023/3...
-
(MAHA DES) महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात 260 जागांसाठी भरती Total: 260 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे न...
-
"तुम्ही कपडे काढले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू" _ मणिपूर मध्ये अनेक महिलांची नग्न धिंड व बलात्काराचे अस्वस्थ क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा