सोमवार, २४ डिसेंबर, २०१२

Ek prem katha

                  शारदा किती उशीर कितीवेळ तुझी वाट पाहायची.रात्रीच े साडेअकरा वाजुन गेले की गं...अरे हो रे,आज थोडा उशीरच झाला.पण तुझ्यासाठी काही आणलंय मी? काय? उकडीचे मोदक तुला खुप आवडतात ना?? हो खुपच आवडतात.रवी डब्यातला एक मोदक खातो.आणि तिच्याकडे बघुन विचारात पडतो..तिला विचारतो,शारदातु ला भिती नाही का गं वाटत?गेली सहा महीने रोज रात्री आपण या झाडाखाली भेटतो.तु माझ्यासाठी कायम काही ना काही घेऊन येतेस. कशाची भीती? भुताखेतांची? बावळटच आहेस भुत वगैरे काही नसतं रे.. आणि एकदिवस खरंच भुताने वाटेत तुला आडवलं तर? तर ते भुत तुच असशील! चेष्टा पुरे हं आता! ok sorry,sorry तु असलास की मला कसलीही भीती वाटत नाही रवी! असं,मग मी तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे सांग ना मला? पुन्हा कधीतरी सांगेन,आत्ता उशीरहोतोय मला जायला हवं. अगं पण जाताना ते एकदा म्हणुन जा ना जे ऐकायसाठी मी इथे आलोय! तुच म्हण ना मग. i love u sharada. mi 2... .12 HOURS AFTER.... शारदाला वाचनाची खुपच आवड आहे.पण कामाच्या ओघामुळे तिला गेले कित्येक दिवस वेळच मिळाला नाही वाचनासाठी.पण आज तिला वेळ मिळालाय.म्हणुन ती स्वातंत्रपुर्व काळापासुन असलेल्या एका ग्रंथालयात गेलीय.तिथल्या धुळखात पडलेल्या बर्याच पुस्तकांच्या कपाटामध्येती सत्यकथांवर आधारीतअसलेली पुस्तके शोधतीये...त्याम ध्ये तिलाएक पुस्तक मिळतं जे पंचवीस वर्षापुर्वी घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारीत पुस्तक आहे.जेव्हा ती ते पुस्तक उघडते तेव्हा तीच्या पायाखालची जमिनच सरकते.तिच्या तोंडचं पाणी पळतं.अंगाचा थरकाप होतो.ती त्या पुस्तकातली काहीच पाने उलगडतीये.त्यानं तर ते पुस्तक घेउन या पुस्तकाच्या लेखकाला भेटण्याची इच्छा ती तिथल्या ग्रंथपालांसमोर व्यक्त करते.त्यांच्याक डे ऊपलब्ध माहीतीद्वारे ते शारदाला त्या लेखकाचा योग्य पत्ता देतात.तो लेखक इथुन फक्त दोन तासाच्या अंतरावर असतो.शारदा लवकरच त्यांच्या घरी पोहोचते.एक पंच्याहत्तर वर्षाचे वृद्ध दरवाजा उघडतात.दारात उभ्या असलेल्या शारदाला पाहुन ते खुपच घाबरतात.त्यांना जब्बर मानसिक धक्का बसतो.त्यांची ही अवस्था पाहुन शारदाला वाटतं की ते आपल्याला आधीपासुनच ओळखतात आणि तिला खुपच घाबरताहेत।हे पाहुन शारदा त्यांना आपली व्यवस्थित ओळख करुन देते.तेव्हा कुठे जाऊन त्यांची परिस्थिती स्थिर होते.तेच त्या पुस्तकाचे लेखक होते.त्यांनी लिहीलेल्या पुस्तकातील या सत्यघटनेविषयी शारदा त्यांना विचारते.ते सांगु लागतात;पंचवीस वर्षापुर्वीची गोष्ट आहे.जेव्हा मी पार्किन्सन कंपनीतल्या रिसर्च कमिटीत काम करायचो.एका खेडेगावात आमचा प्लांट लागणार होता म्हणुन आमची कमिटी तिथलं निरीक्षण करायला गेली होती.पण त्या दिवशी तिथले गावकरी एका युवकाला जबर मारहाण करत आणत होते.एक मुलगी जीवाच्या आकांताने रडत होती.त्याला मारु नका,त्याला मारु नका।असं म्हणत होती पण कोणीही ऐकलं नाही आणि सर्वाँसमोर त्याला एका झाडावर लटकवण्यात आलं आणि त्यातच त्याचामृत्यु झाला.. पण हे कसं शक्य आहे या पुस्तकात जो फोटो दिलाय तो तर माझ्या प्रियकराचा आहे त्याला तर मी रोज भेटते आणि आम्ही दोघं एकमेकांवर खुप प्रेम करतो.मी तर या पुस्तकातला याचा फोटो बघुनच तुमच्याकडे आलेय.. पोरी ही निसर्गाची किमया म्हण किँवा आणखी काही पण हा तोच मुलगा आहे,ज्याच्यावर तु प्रेम करतेस. पण तुम्ही हे खात्रीने कसं सांगु शकता.?त्यांनी एका जुन्या कपाटातुन फोटो काढला आणि तिला दाखवला तो फोटो तिचाच होता..ही आहेती मुलगी जी त्या मुलावर प्रेम करायची आणि जिने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला।तो फोटो शारदाचाच होता.म्हणुनच तर मी तुला पहील्यांदा दाराशी पाहीलं तेव्हा घाबरलो होतो. मन सुन्न झालेल्या अवस्थेत शारदातिथुन निघाली.मनात असंख्य प्रश्ननिर्माण झाले होते.रवी मेलेला आहे ही गोष्ट गृहीत धरुन चालल्यास घडलेल्या बाकी सर्व गोष्टीँचा योग्य तो मेळ बसत होता.शारदाला ही गोष्ट पुर्णपणे पटली की,रवी जिवंत नाहीये. रात्र झाली शारदा पुन्हा रवीला भेटण्यासाठी त्याच झाडाजवळ आली होती. आज पुन्हा उशीर,अगं कितीवेळा तु उशीर करतेस?आणि हे डाव्या हातालाकापड कसलं बांधलयस? रवी मला तुला काही विचारायचंय?मला खरं खरं सांगशील? हो,विचार नक्की खरंखरं सांगेन तुझा जन्म केव्हाचा आहे? रवीःशेवटी तुला सगळं कळलंय तर..अगं मग मला असं तिरक्याने का विचारतेयस.सरळ विचार ना.होय मी एक आत्मा आहे.मी तुला सगळं खरं खरं सांगतो! त्याची गरज नाहीये.मला सगळं ठाऊक आहे.मला फक्त एवढंच सांग तु मला तुझ्याबरोबर नेणार आहेस की नाही?मी फक्त तु जिथे जाशील तिथेच जायचंय?सांग मला सोबत नेशील ना? शारदा काय बोलतेयस तु?मी तुझा जीव नाही घेउ शकत.तुला कळत कसं नाही.असं काय करतेस तु? जे काय करायचं ते तासाभरापुर्वी केलंय मी... .काय?काय केलंयस तु? शारदाने आपल्या डाव्या हाताला बांधलेलं कापड काढलं.आणि त्याला दाखवलं.तिच्या हाताची नस कापलेलीहोती.अगं हे काय केलंस?याने तुझा जीव जाईल.चल.. थांब रवी माझा जीव मी आधीच दिलाय तासाभरापुर्वीच. मी ही आत्ता जीवंत नाही.माझं शरीर मी मागे ठेवुन आलेय.आत्ता तरी मी तुझी होईल ना.आता तरी मला तुझ्यासोबत नेशील ना? रवीने शारदाला एक घट्ट मिठी मारली.त्या मिठीतला ओलावा दोघेहीअनुभवत होते.दोघांच्याह ी डोळ्यात अश्रु भरुन वाहत होते.पण ते जमिनीवरही पडत नव्हते,हवेतच विरुन जायचे.जसं काही त्यांचं अस्तित्वच संपलंय.शारदा आणि रवीसारखं....... 
                                                             ...story written by एक प्रियकर

सोमवार, १० डिसेंबर, २०१२

प्रेमा वर कविता करायलाकुणावर तरी प्रेम करावे लागते,त्याला सांगितले नसले तरीमनातून प्रेम अनुभवावे लागते..त्याला भेटण्याची उत्कटतात्याच्या नकळत अनुभवावी लागते.तो 'हो' म्हणेल की 'नाही"ह्या विचारात रात्र घालवावी लागते..त्याच्या साथी गुलाब तोड्तानाकाट्या नि घायाळ व्हावे लागते.इश्काची आग,त्याच्या नकळतत्याच्या ह्रुदयात ही पेट्वावी लागते..प्रेम आपले त्याच्या वर असलेतरी त्याचे दुसर्या वर असू सकतेअणि जर दुर्दैवाने तसे निघाले त्तर......विरह गीत लिहायची तयारी असावी लागते

बुधवार, ५ डिसेंबर, २०१२

अभियंत्रज्ञ

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
(जन्मः १५ सप्टेंबर १८६० - मृत्यूः १४ एप्रिल १९६२)
विश्वेश्वरय्यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० रोजी चिकबल्लापूर, म्हैसूर येथे झाला होता. म्हणून दरसाल १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन अभियंत्रज्ञदिन म्हणून पाळला जातो. त्यांची मातृभाषा तेलुगू आहे. पुढे विश्वेरय्यांनी प्रथम तत्कालीन म्हैसूर संस्थानाकरता आणि नंतर भारत देशाकरता अत्यंत महत्त्वाची अनेक पदे भूषवली. देशांतर्गत अनेक महत्त्वाच्या अभियांत्रिकी प्रकल्पांची संकल्पना रुजवली आणि ते देशाच्या सर्वोच्च आदरास पात्र ठरले.
ते विख्यात अभियंत्रज्ञ आणि मुत्सद्दी होते. आधुनिक भारताच्या निर्माणात त्यांनी अत्यंत कळी भूमिका बजावलेली आहे.ते कृष्णराजसागर धरण आणि प्रसिद्ध वृंदावन उद्यानाचे शिल्पकार होते. धरणांच्या दरवाजांकरता त्यांनी प्रथमच पोलादी झडपांचा उपयोग केला. हल्लीच्या पाकिस्तानातील सुक्कूर गावास सिंधू नदीचे पाणी पुरविण्याची योजना त्यांनी केली.
१९१२ ते १९१८ दरम्यान ते म्हैसूरसंस्थानचे दिवाण होते. त्या काळात त्यांनी संस्थानात चंदनतेल आणि चर्म वस्तुंच्या उद्योगांची निर्मिती केली. भद्रावती पोलाद प्रकल्प सुरू केला. तिरुमला आणि तिरुपती दरम्यानचा रस्ता त्यांनी निर्माण केला.
१९०६-०७ दरम्यान प्रतिनियुक्तीवर एडनमध्ये असतांना त्यांनी एडन शहराची पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण योजना निर्माण केली. निजामाकरता काम करत असता, हैदराबाद शहराकरतात्यांनी पूरनियंत्रण योजना राबवली तर विशाखापट्टणम शहरास समुद्री क्षरणापासून संरक्षण करणारी योजना दिली. १९५५मध्ये, पहिली भारतरत्न पदवी, त्यांना दिली गेली. पंचम जॉर्ज बादशहाने त्यांना ब्रिटिश भारतीय साम्राज्याचा नाईटहूडही दिलेला होता. ते शंभर वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्या हयातीतच, भारत सरकारने त्यांचे नावे पोस्टाचे तिकिट काढले. वयाच्या १०१ व्या वर्षी १४ एप्रिल १९६२ रोजी त्यांना बंगळुरू येथे देवाज्ञा झाली.
भारतातील अग्रगण्य अभियंत्यांत मानाचे स्थान असलेल्या ह्या आधुनिक भारताच्या आद्य अभियंत्यास अभियंत्रज्ञदिनी आदरपूर्वक प्रणिपात!

एकदा केंव्हा तरी

एकदा केंव्हा तरी शांतपणे बसावंआणि वयानुसार आपण
काय काय गोष्टी सोडल्या याचा आढावा घ्यावा.
मग लक्षात येतं की,
आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात् खाल्लेली नाही.
जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही.
चटक्यांच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण
परिस्थितीने दिलेले चटके सोसतानाच पुरेवाट झालेली आहे.
कॅलिडोस्कोप पाह्यलेला नाही.
सर्कस मधला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही.
तसच कापसाची म्हातारी पकडण्याचाचार्म ही राह्यलेला नाही.
कापसाच्या म्हातारीने उडता उडताआपला “बाळपणीचा काळ सुखाचा”
स्वतः बरोबर कधी नेला ते आपल्याला कळलंच नाही.
आता त्या ट्रिप्स नाहीत.
दोन दोन मुलांच्या जोड्या करुन चालणं नाही.
विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत.
प्रवासात बोगदा आला तर एक अनामिकहुरहुर नाही….
त्या उडणा-या म्हातारीने हे सगळे आनंद नेले.
त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं.
म्हणूनच ती अजुनही उडू शकते.
आपण अजून जमिनीवरच आहोत॥
-मंगेश पाडगांवकर

"तुम्ही कपडे काढले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू"

"तुम्ही कपडे काढले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू"  _ मणिपूर मध्ये अनेक महिलांची नग्न धिंड व बलात्काराचे अस्वस्थ क...